नायलॉन/प्लास्टिक बटण निर्मिती उद्योग Button Manufacturing Business

आपल्या सर्वांना बटणे माहित आहेत. शर्ट, पँट, लहान मुलांचे कपडे, महिलांचे कपडे, तयार कपडे, यासाठी प्लॅस्टिकची बटणे लागतात. आपल्या देशाची लोकसंख्या मोठी आहे, तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येला त्या नुसार कपडे लागतात व त्यासाठी बटणे लागतात.

तयार कपडे उत्पादक ती बटणे उत्पादकांना देण्याचा उद्योग सुरू केल्यास त्यांना चांगला नफा मिळतो. प्लॅस्टिकची बटणे बनवण्यासाठी इलेक्ट्रिक स्व-चालित स्वयंचलित यंत्रे उपलब्ध आहेत. लहान उद्योग सुरू करायचा असेल तर हँड मोल्डेड मशिनरी बाजारात उपलब्ध आहेत.

या स्वयंचलित प्लास्टिक मोल्डिंग मशीनद्वारे नायलॉन किंवा अॅक्रेलिकची बटणे तयार केली जातात. P F & U F बटणे देखील बनविली जातात. इंजेक्शन मोल्डिंग, कॉम्प्रेशन मोल्डिंगद्वारे प्लास्टिकची बटणे तयार केली जातात. अॅक्रेलिक बटणे बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल आपल्या देशात नाही त्यामुळे तो परदेशातून आयात केला जातो.

पॉलिस्टर नायलॉन बटणे बनवण्यासाठी इन्स्टॉलेशन मशिनरी भारतात उपलब्ध आहेत. नायलॉनची शीट, अॅक्रेलिक द्वारे बटणाच्या आकाराचे तुकडे केले जातात. डिझायनिंग मशीनच्या मदतीने त्यांना आवडेल तसा आकार दिला जातो. बटणांमध्ये छिद्र करून त्यांची चमक आणण्यासाठी मोठ्या ड्रममध्ये बटणे लावून पॉलिशिंग केली जाते.

कम्प्रेशन पद्धतिने प्लॅस्टिक बटणे तयार करण्यासाठी मोल्डिंग बॅरलमधील कच्चा माल हिटरद्वारे ओतून उष्णता दिली जाते. जो आकार/ डिझाइन द्यायची आहे त्या बटणांनुसार, मल्टी कॅव्हिटी मोल्ड्स बसवले जातात. स्वयंचलित मशीन सुरू केल्याने, कच्चा माल बसवलेल्या आकारानुसार मोल्डिंग मोल्डमध्ये जातो त्यानुसार डिझाइनचे बटणे तयार केली जातात.

हँड मोल्डिंग यंत्राद्वारे कोणत्या रंगाची बटणे तयार करायची त्या रंगाच्या गोळ्या घ्या आणि त्या साच्यात गोळ्या फेकून द्या डाय गरम केल्यानंत किती बटणे तयार तयार करायची आहेत त्यानुसार तापलेल्या डायमध्ये प्लास्टिकच्या गोळ्या टाका. तुम्हाला ज्या प्रकारामध्ये बटणांची डिझाइन पाहिजे त्या प्रकारच्या डिझाइनमध्ये बटणे तयार होत राहतील.


किमान पैशात आणि कमी जागेत सुरू करता येणारे उद्योग आहे, घरबसल्याही सुरू करता येणारा हा उद्योग आहे. प्लास्टिक बटणे किंवा कच्चा माल खराब होत नाही त्यामुळे बटणे बनवण्याच्या उद्योगांमध्ये नुकसान होण्याची कोणतीही शक्यता नाही. फॅशनच्या आधुनिक युगात फॅन्सी वस्तूंना जास्त मागणी असल्याने विविध आकर्षक आणि रंगीबेरंगी डिझाइन्समध्ये बटणे बनवण्याचा व्यवसाय हा तुमचा कुटुंबाला रोजगार देतो.

बाजार: प्लास्टिकच्या बटणांचा सर्वात मोठा ग्राहक म्हणजे वस्त्र उद्योग जिथे रेडीमेड कपडे बनवले जातात, अशा फर्म्स, कंपन्यांमध्ये जाऊन ज्या डिझाईनचे कपडे बनवले जातात त्याप्रमाणे आकर्षक रंगीत डिझाइनची बटणे तयार करा आणि रेडीमेड कपडे उत्पादकांना द्या. त्यांच्या कंपनीच्या फर्ममध्ये जाऊन आकर्षक नमुने दाखवा आणि त्यांच्याकडून नमुन्यांनुसार ऑर्डर घ्या आणि त्यांना हवे तसे डिझाइन बटणे तयार करा.


यासोबतच बटनांचे घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, टेलरिंगची दुकाने, स्टेशनरी दुकाने, लहान आणि मोठी सामान्य दुकाने, मार्केट, कटलरीची दुकाने त्यांना बटणे देऊ शकतात. बटणे विकण्यासाठी स्वतः मार्केटिंग करा. किंवा विक्री प्रतिनिधी नियुक्त करा.

कच्चा माल: नायलॉन, अॅक्रेलिक, पॉलिस्टर, तयार शिट्स, प्लास्टिक च्या रंगीत गोळ्या, पॅराफिन व्याक्स, पिगमेंटस, P.V.C. रेजिन्, फिलर्स, स्टेवलायझर, प्लास्टिसायझर इत्यादी कच्चा माल लागतो.

मशिनरी : इंजेक्शन मोल्डिंग मशीन्स, मल्टी कॅव्हिटी मोल्ड्स, ड्रिलिंग मशीन्स, हँड मोल्डेड मशिन अशी यंत्रसामग्री आणि त्याच्या देखभालीसाठी लागणारी सामग्री आवश्यक असेल.

Post a Comment

0 Comments